

ACTION RECOMMENDED AGAINST TILAK VARMA AND VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
ACTION RECOMMENDED AGAINST TILAK VARMA AND VAIBHAV SOORYAVANSHI: भारताचा अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे, जिथे भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान(IND VS AFG) यांच्यात त्रिदेशीय मालिका सुरू आहे. या मालिकेत सोमवारी भारत अ संघ आणि श्रीलंका अ संघ यांच्यात सामना खेळला गेला.
या सामन्यात अनपेक्षित घटनाक्रम घडला. १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही (VAIBHAV SOORYAVANSHI) या मालिकेत अद्याप मोठी छाप पाडता आलेली नाही. आणि याच सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. अखेर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्यामध्ये भारत अ संघाला पराभवाचा सामना करावा लागला.