

Vaibhav Sooryavanshi statement goes viral
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI Video Viral: आयपीएल २०२६ मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा भारताचा १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकत त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपल्या जोरदार फलंदाजीची छाप पाडत आहे.
मैदानावर कोणत्याही गोलंदाजाला न घाबरणारा वैभव आता पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने दिलेल्या चार शब्दांच्या उत्तर पुन्हा एकदा चर्चेचा विषय आहे.