वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

Vaibhav Sooryavanshi Test Dream: वैभव सूर्यवंशीने कमी वयात आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर त्याला भारतीय टी-२० संघातही संधी मिळाली. मात्र, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मते, टेस्ट क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी वैभवला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
Vaibhav Sooryavanshi Test Dream

Rahul Dravid statement on Vaibhav Suryavanshi Test future

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Test Dream: वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Sooryavanshi) अगदी कमी वयात आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर त्याला भारतीय टी-२० संघातही संधी मिळाली. आता त्याची नजर लाल चेंडूच्या क्रिकेटवर आहे. मात्र, भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मते, वैभवच्या टेस्ट क्रिकेटच्या स्वप्नासमोर एक मोठी अडचण आहे.

द्रविड यांच्या मते, वैभवमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता नक्कीच आहे. मात्र, त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूचे पुरेसे सामने खेळता येतील का, हा मोठा प्रश्न आहे. वैभवच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय आणि व्हाईट-बॉल क्रिकेटच्या वेळापत्रकामुळे त्याला रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये सलग दोन पूर्ण हंगाम खेळणं कठीण होऊ शकतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com