

VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI JUNGLE SAFARI: १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी नेहमीच आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत असतो. मात्र, सध्या तो क्रिकेटच्या मैदानाबाहेर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. वैभवचा जंगल सफारी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये वैभव सफारी जीपमधून जंगलात फिरताना दिसत आहे. पावसाळ्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल हिरवंगार झालं असून, अशा वातावरणात वैभवने आपल्या सहकारी खेळाडूंसोबत जंगल सफारीचा आनंद घेतला.