Varun Chakravarthy Defends Kid Trolled For Rude Behaviour With Amitabh Bachchan On KBC
esakal
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ज्युनियर स्पर्धक इशित भट्ट ( Ishit Bhatt ) याने सुपरस्टार अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्यासोबतच्या त्याच्या वागण्यामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे त्याला प्रचंड टीका सहन करावी लागत आहे. अमिताभ यांनी प्रश्न सांगताच या मुलाचा अतिआत्मविश्वास सर्वांच्या डोक्यात गेला. तो अमिताभ यांना ज्या पद्धतीने बोलत होता, ते पाहून नेटिझन्स या मुलाचे संस्कार काढू लागले. शिवाय अनेकांना याला फटकवून काढायला हवे असे मत मांडले.