Irani Cup 2025
sakal
Cricket
Irani Cup 2025: विदर्भ तिसऱ्यांदा इराणी करंडक विजेता; शेष भारत संघाला ९३ धावांनी नमवले, धुलची एकाकी झुंज, अथर्व सामनावीर
Atharv Tayade:घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रणजी विजेत्या विदर्भाने संघर्षपूर्ण लढतीत बलाढ्य शेष भारत संघाला ९३ धावांनी नमवून लागोपाठ तिसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या इराणी करंडकावर नाव कोरले.
नागपूर : घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रणजी विजेत्या विदर्भाने संघर्षपूर्ण लढतीत बलाढ्य शेष भारत संघाला ९३ धावांनी नमवून लागोपाठ तिसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या इराणी करंडकावर नाव कोरले. शेष भारताच्या यश धुलने ९२ धावांची आक्रमक खेळी करून विदर्भाच्या तोंडचे पाणी पळविले होते. पहिल्या डावात शानदार शतक झळकविणाऱ्या विदर्भाच्या अथर्व तायडेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.