

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Semifinal : रणजी ट्रॉफीच्या सेमिफायनल सामन्यात विदर्भाने मुंबईविरूद्ध पहिल्या डावात ३८३ धावा उभारल्या. पण विदर्भाच्या पहिल्या डावाचे प्रत्युत्तर देण्यात मुंबई संघ कमी पडला. आकाश आनंदने शतक ठोकले, पण त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. आकाश वगळता मुंबईच्या कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. मुंबईचा डाव २७० धावांवर गुंडाळल्यामुळे विदर्भला ११३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ४ बाद १४७ धावा करत विदर्भाने आघाडी २६० धावांची केली आहे.