

Vidarabha vs Karnataka
Sakal
Vidarbha vs Karnataka VHT 2025-26 Semifinal: विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी उपांत्यपूर्व लढतीत दिल्लीचे आव्हान मोडीत काढल्यानंतर विदर्भाची आता कर्नाटकविरुद्ध आणखी एक परीक्षा होणार आहे.
उभय संघादरम्यान प्रकाशझोतात होणारा हा उपांत्य सामना आज (गुरुवार, १५ जानेवारी) बंगळूर येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने विदर्भाला गतवर्षी अंतिम लढतीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.