

Vijay Hazare Trophy 2025-26 Vidarbha & Punjab Qualify for Semis
Sakal
VHT 2025-26 Semi-Final Schedule: विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून आता अंतिम ४ संघ निश्चित झाले आहेत. बंगळुरूला झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा आणि चौथा सामना मंगळवारी (१३ जानेवारी) खेळवण्यात आला होता.
या सामन्यांनंतर आता उपांत्य फेरीत (Semifinals) खेळणारे चार संघ निश्चित झाले. तिसरा उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध पंजाबने (Punjab vs Madhya Pradesh) तब्बल १८३ धावांनी विजय मिळवला, तर चौथ्या सामन्यात विदर्भाने दिल्लीला ७६ धावांनी (Vidarbha vs Delhi) पराभूत केले. त्यामुळे विदर्भ आणि पंजाब यांनी उपांत्य फेरीत धडक मारली.