BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

Mohammad Rizwan and Litton Das fight video: बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर जोरदार रंगलेला वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दास यांच्यात थेट मैदानात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
Litton Das and Mohammad Rizwan argue during the BAN vs PAK 2nd Test

Litton Das and Mohammad Rizwan argue during the BAN vs PAK 2nd Test

esakal

Updated on

BAN vs PAK 2nd Test Litton Das sledges Mohammad Rizwan after fifty: बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे, परंतु त्यांच्या मार्गात पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान उभा राहिला आहे. ४३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने ७ बाद ३१६ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी आणखी १२१ धावा करायच्या आहेत, तर बांगलादेशला तीन विकेट्स हव्या आहेत. मोहम्मद रिझवान मैदानावर उभा राहिला आहे आणि त्याने नाबाद ७५ धावा केल्या आहेत. पण, बांगलादेशच्या खेळाडूंनी त्याच्याविरुद्ध मोर्चेबांधणी केली आहे आणि ते जोरदार स्लेजिंग करताना दिसत आहेत. याचे रुपांतर भांडणात झाले आणि यष्टिरक्षक लिटन दास व रिझवान यांचा वाद सोडवण्यासाठी अम्पायरला यावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com