.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Babar Azam Viral Video: पाकिस्तानचा टी२० कर्णधार बाबर आझम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या नेतृत्वावरच नाही, तर त्याच्या खराब कामगिरीवरही टीका होत आहे. अशातच गेल्या काही दिवसातील त्याचे काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात तो एका युवा खेळाडूकडून क्लिन बोल्ड होताना दिसत आहे.
पाकिस्तानमधील देशांतर्गत स्पर्धा चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धा १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत बाबर आझम स्टॅलियन्सकडून खेळणार आहे. दरम्यान, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंनी सरावला सुरुवात केली आहे. अशात एका सराव सामन्यातील हा बाबरचा व्हिडिओ आहे.