
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई येथे होत आहे. भारताचे सामने दुबईत होत आहे, तर इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये खेळत आहेत.
ही स्पर्धा पाकिस्तानला खेळवण्यावरून आधीच बरेच वाद झाले आहेत. त्यानंतर अखेर ही स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या खेळाडूंच्या सुरक्षेवर बराच भर देण्यात आला आहे.