Yuzvendra Chahal scores 29-ball century video
esakal
Yuzvendra Chahal scores 29-ball century video: भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हीन पीटरसन ( Kevin Pietersen )ने दिलेले चॅलेंज पूर्ण केले. फिरकीच्या जाळ्यात भल्याभल्या फलंदाजांना अडकवणाऱ्या चहलने चक्क फलंदाजीत कौशल्य दाखवले. पंजाब किंग्सकडे सलामीला फलंदाजीला पाठवण्याची विनंती करणाऱ्या चहलची आता फ्रँचायझीला दखल घ्यावी लागणार आहे. पीटरसनने भारतीय खेळाडूला ५० चेंडूंत ( 50 Balls to Score 100) शतक झळकावण्याचे आव्हान दिले होते, परंतु पठ्ठ्याने २९ चेंडूंतच ते पूर्ण केले.