Vijay Hazare Trophy Schedule: रोहित शर्मा, विराट कोहली यांना खेळताना Live कुठे पाहता येणार? समोर आलं वेळापत्रक

Vijay Hazare Trophy 2025-26 schedule and venues: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ चं अधिकृत वेळापत्रक जाहीर झालं असून, भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा विशेष ठरणार आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज खेळाडू या देशांतर्गत वन डे स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहेत.
Vijay Hazare Trophy 2025-26 schedule is out. Check groups, teams, venues, match timings

Vijay Hazare Trophy 2025-26 schedule is out. Check groups, teams, venues, match timings

esakal

Updated on

Where to watch Rohit Sharma, Virat Kohli Vijay Hazare matches live: रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन स्टार फलंदाज विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे रोहित व विराट हे फक्त वन डे फॉरमॅट खेळत आहेत. या दोघांनाही २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु BCCI ने त्यांना फिटनेस राखण्यासाठी विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसारच रोहित व विराट अनुक्रमे मुंबई व दिल्ली संघासाठी दोन सामना खेळणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com