

Vijay Hazare Trophy
sakal
जयपूर : महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाला विजय हजारे एकदिवसीय करंडकातील क गटातील साखळी फेरीच्या लढतीत पंजाब संघाकडून हार पत्करावी लागली. प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग व नमन धीर यांची अर्धशतकी खेळी व अभिषेक शर्मा याच्या ४८ धावा पंजाब संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. ऋतुराज गायकवाड एक धावेवरच बाद झाला. हे अपयश महाराष्ट्राला बोचणी देणारे ठरले.