Vijay Hazare Trophy : रोहित शर्मावर 'लक्ष' ठेवण्यासाठी गौतमने पाठवला 'खास' माणूस; त्याच्यासमोर प्रेक्षकांनी गंभीरचे वाभाडे काढले

Gautam Gambhir sends observer to watch Rohit Sharma : विजय हजारे ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध सिक्कीम सामन्याकडे केवळ प्रेक्षकांचेच नव्हे, तर भारतीय क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रोहित शर्माच्या कामगिरीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खास माणूस जयपूरला पाठवल्याचे स्पष्ट झाले.
National selector RP Singh watches Rohit Sharma during the Mumbai vs Sikkim Vijay Hazare Trophy match in Jaipur

National selector RP Singh watches Rohit Sharma during the Mumbai vs Sikkim Vijay Hazare Trophy match in Jaipur

esakal

Updated on

RP Singh attends Mumbai vs Sikkim Vijay Hazare Trophy: रोहित शर्माची क्रेझ काय आहे, हे जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पाहायला मिळाले. रोहित व विराट कोहली हे दोन्ही दिग्गज बऱ्याच वर्षांनी आपापल्या स्थानिक संघाकडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी उतरले आहेत. ३७ वर्षाच्या रोहितला ( Rohit Sharma) २०२७ सालचा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यासाठी त्याने फिटनेसवर भरपूर मेहनतही घेतली आहे. वन डे संघात कायम राहायचे असल्यास राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे असल्याचे BCCI ने स्पष्ट केले. त्यामुळेच भारताचे अनेक स्टार खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com