
Vinod kambli discharge from hospital: भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रकृती खालावल्यामुळे विनोद कांबळीला भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला लघवीची समस्या जाणवत होती आणि क्रॅम्प आल्याने चालणेही अशक्य झाले होते. नंतर टेस्टमध्ये त्याच्या मेंदूत गुठळ्या झाल्याचे आढळले होते. पण आता कांबळीला बरे वाटत असून त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्जनंतर कांबळीने चाहत्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.