Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

Ajit Agarkar India squad selection latest update: टीम इंडियाच्या आगामी आशियाई स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी निवड समितीसमोर काही महत्त्वाचे निर्णय आहेत.
Varun Chakravarthy

Vipraj Nigam likely to join India Asian Games squad

esakal

Updated on

Vipraj Nigam to replace Varun Chakravarthy in Asian Games 2026: अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाच्या निवड समितीची बैठक पार पडणार आहे आणि ही आगरकरची शेवटची बैठक असण्याची दाट शक्यता आहे. BCCI त्याचा करार वाढवण्याच्या मानसिकतेत नाही आणि त्यामुळे जाता जाता आगरकर काही कठोर निर्णय घेऊ शकेल. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची याचाही निर्णय, या बैठकीत होणार आहे. वरुणच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचा ऑलराऊंडर विप्रज निगम याचा विचार केला जात असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com