Zimbabwe beat Afghanistan by 57 runs in Sharjah Test
ESAKAL
Zimbabwe win Test series against Afghanistan 1-0 : आतापर्यंत इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले रोमहर्षक कसोटी सामने सर्वांनी पाहिले असेल आणि मंगळवारी यात आणखी एका थरारक लढतीची भर पडली. अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक नाट्यमय सामन्यांमध्ये नोंदवला गेला. अफगाणिस्तानला पराभव टाळण्यासाठी केवळ तीन चेंडू खेळून काढायचे होते, परंतु ग्रॅमी क्रेमरच्या चेंडूने जियूर रहमानच्या बॅटचे हलके चुंबन घेतले अन् स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बेन्नेटने जमिनीवर पडणारा चेंडू टिपला अन् एकच थरार... जल्लोष पाहायला मिळाला.. झिम्बाब्वेने ५७ धावांनी कसोटी जिंकून मालिका १-० अशी जिंकली.