Dinesh Karthik Exposes Ravi Shastri: भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) हा इंग्लंड-भारत मालिकेत समालोचकाच्या भूमिकेत आहे. बर्मिंगहॅम कसोटीच्या विजयानंतर कार्तिक आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी इंग्लंडच्या माजी खेळाडूंसह एका चर्चासत्रात सहभाग घेतला होता. त्यात कार्तिकने सर्वांसमोर शास्त्रींना ट्रोल केले. सार्वजनिक पॉडकास्टमध्ये कार्तिकने त्याला शास्त्रींनी त्याला तुझं खेळून झालंय आणि पुढे येण्याची तसदी घेऊ नको, असे म्हटले होते. हे जगजाहीर केले. २०१८ च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील लॉर्ड्स कसोटीनंतरचा हा किस्सा आहे आणि यावेळी त्याने नासेर हुसेनचेही नाव घेतलं.