झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७५ धावा केल्या.
ब्रायन बेनेट्टने ५७ चेंडूत ८१ धावांची तडाखेबाज खेळी केली, ज्यात १२ चौकारांचा समावेश होता.
१७व्या षटकात दसन शनाकाचा अविश्वसनीय 'टॅग टीम कॅच' मुनयोंगाने टिपला.
Munyonga completes stunning rebound catch to dismiss Shanaka : झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अविश्वसनीय झेल पाहायला मिळाला. श्रीलंकेने ४ विकेट्स व ५ चेंडू राखून सामना जिंकला असता तरी झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी घेतलेल्या कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. १७ व्या षटकात श्रीलंकेच्या दासून शनाकाने चेंडूवर जोरदार प्रहार केला अन् तो डीप मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग उडाला... त्यानंतर जे घडलं त्यावर कुणालाच विश्वास बसेना...