Viral video of Hetmyer lying down catch in cricket : गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने ग्लोबल सुपर लीग २०२५ चे जेतेपद नावावर करताना अंतिम सामन्यात रंगपूर रायडर्सवर ३२ धावांनी विजय मिळवला. हा सामना जॉन्सन चार्स व रहमनुल्लाह गुरबाज यांनी गाजवला असला तरी चर्चा रंगली ती शिमरोन हेटमायर याच्या अतरंगी झेलची. कॅच पकडण्यासाठी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा हा खेळाडू चक्क मैदानावर झोपला.