Funny cricket video MLC 2025 Seattle Orcas vs MI New York : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI NEW YORK संघाने मेजर लीग क्रिकेटमध्ये गुरुवारी सिटल ऑर्कास संघावर ७ विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद केली. ऑर्कासचे ५ बाद २०० धावांचा न्यू यॉर्कने १९ षटकांत ३ बाद २०३ धावा करून पाठलाग केला. ऑर्कासच्या कायल मेयर्स ( ८८) व शयान जहांगिर ( ४३) यांच्या खेळीला न्यू यॉर्ककडून मोनकांक पटेल ( ९३) व मिचेल ब्रेसवेल ( नाबाद ५०) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पण, या सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला. ट्रेंट बोल्टचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय.