Viral Video: जीव गेला असता ना भाऊ...! वेस्ट इंडिज गोलंदाजाचा खतरनाक बाऊन्सर, फलंदाज कोसळला; पुढे अनपेक्षित घडलं...

West Indies pacer bouncer hits batter helmet video: वेस्ट इंडिज चॅम्पियनशिपमधील एका सामन्यात धक्कादायक घटना घडली असून, एका वेगवान गोलंदाजाच्या धोकादायक बाऊन्सरमुळे फलंदाज जखमी झाला आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
West Indies Pacer’s Deadly Bouncer Floors Batter, Match Abandoned

West Indies Pacer’s Deadly Bouncer Floors Batter, Match Abandoned

esakal

Updated on

dangerous pitch match abandoned West Indies Championship: वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज खतरनाक बाऊन्सरसाठी पूर्वी ओळखले जायचे आणि त्यामुळे त्यांचा सामना करताना फलंदाजांच्या मनात एक कायम भीती असायची, ती म्हणजे हा चेंडू माझ्या डोक्यावर आदळला तर? पण, आता ती भीती निघून गेली आहे आणि विंडीज गोलंदाजांनी ती रया गमावली आहे. मात्र, आज एका सामन्यात वेस्ट इंडिजचा गोलंदाज जयडेन सील्सच्या (Jayden Seales) अनपेक्षित बाऊन्सरमुळे फलंदाज कोसळला. फलंदाजाचं आता काही खरं नाही, असंच क्षणासाठी वाटलं होतं. पण, पुढे जे घडले, ते त्याहून अनपेक्षित होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com