Viral Video : माझ्या मुलीला वाचव ! सुरक्षा भेदून तिने रोहित शर्माचा हात खेचला, एकच गोंधळ उडाला; पोलिसांची पळापळ अन्...

Rohit Sharma security breach viral video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माची सुरक्षा भेदून एका महिलेने त्याचा हात खेचला. ही घटना संघाच्या हॉटेलबाहेर घडल्याचं सांगितलं जात असून, काही क्षणांसाठी एकच गोंधळ उडाला.
shocking viral video shows a woman breaching security and grabbing Rohit Sharma at the team hotel

shocking viral video shows a woman breaching security and grabbing Rohit Sharma at the team hotel

esakal

Updated on

Rohit Sharma shocked after fan intrusion: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा वन डे सामना नुकताच पार पडला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे खेळाडू हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना एका महिलेने भारताचा फलंदाज रोहित शर्माचा ( Rohit Sharma) हात धरला आणि त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये एक महिला सुरक्षा भेदून रोहितच्या जवळ जाताना दिसत आहे, या घटनेने तो हैराण झालेला दिसला. पोलिस कर्मचारी लगेच तिथे धावले आणि त्यांनी त्या महिलेला बाजूला केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com