

Dinesh Karthik's Big Advice for Gautam Gambhir
esakal
Dinesh Karthik's Big Advice for Gautam Gambhir: आगामी आयसीसी(icc) पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक हा संयुक्तपणे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील ५४ सामन्यांपैकी ४१ सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहेत.
पण विश्वचषक म्हटले की भारतीय संघात सर्वाधिक चर्चा होते ती विराट कोहली(virat kohli) आणि रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंची. मात्र, २०२७ च्या विश्वचषकात विराट कोहली असणार की नाही, याबाबत बीसीसीआय(bcci) किंवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर(gautam gambhir) यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. अशातच आता विराट कोहलीला कशाप्रकारे हाताळावे, याबाबत एक मोठा सल्ला समोर आला आहे.