IPL 2025 जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर RCB आणि विराट कोहली जवळपास तीन महिने सोशल मीडियावर मौनात होते.
RCB ने ‘RCB Cares’ अंतर्गत प्रत्येक मृत चाहत्याच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर केली.
Virat Kohli has broken his silence on the Bengaluru stampede tragedy : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे जेतेपद पटकावले आणि घरच्या प्रेक्षकांसोबत सेलिब्रेशनची तयारीही झाली होती. पण, त्या सेलिब्रेशनचे दुःखद घटनेत रुपांतर झाले आणि बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेला जवळपास तीन महिने झाले आणि त्यानंतर सोशल मीडियावरून गायब झालेल्या RCB ने काही दिवसांपूर्वी पोस्ट लिहिली. त्यानंतर आज विराट कोहलीने 'मौन' सोडले.