Virat Kohli breaks silence on Sachin Tendulkar comparisons
esakal
Virat Kohli statement on Sachin Tendulkar comparison: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याची तुलना ही महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याशी होत आली आहे. सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित अनेक विक्रम नावावर केले आणि त्यातील बहुतेक विराटने मोडले आहेत. काल वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात विराटने १३९ धावांची नाबाद खेळी करताना वन डे क्रिकेटमध्ये १५००० धावांचा टप्पा ओलांडला. सचिनपेक्षा कमी डावांमध्ये विराटने हा पराक्रम केला आणि वन डेत १५ हजार धावा करणारा तो सचिनंतर दुसरा फलंदाज ठरला. सचिनसोबत होणाऱ्या तुलनेशी विराटने २०१७ मध्ये पहिल्यांदा भाष्य केले होते.