Why did Virat Kohli retire from Tests? Here's what he said : भारताचा सर्वात तंदुरूस्त क्रिकेटपटू विराट कोहली याने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयाने भल्याभल्या क्रिकेट पंडितांना, चाहत्यांना धक्का बसला. विराटच्या बॅटमधून धावा होत नसल्या तरी त्याचा फिटनेस पाहता तो किमान पुढील २-३ वर्ष खेळत राहील असा अंदाज होता. मे महिन्यात रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर करताच काही दिवसांनी विराटनेही हाच मार्ग अवलंबला. आता ही दोघं फक्त वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.