विराट कोहलीचा फिटनेस टेस्ट इंग्लंडमध्ये घेण्यात आला, तर बाकी सर्व खेळाडूंचा बंगळुरूमध्ये.
कोहली व रोहित कसोटी व टी-20 मधून निवृत्त झाले असून आता त्यांच्या वन डे निवृत्तीवर चर्चा सुरू आहे.
रोहित शर्मा, बुमराह, सिराजसह 28 हून अधिक खेळाडूंचा पहिला टप्पा पूर्ण किंवा अंशतः झाला आहे.
Why Virat Kohli’s fitness test was held in England : विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात टीम इंडियामध्ये तंदुरुस्तीचे महत्त्व वाढले आणि त्यामुळेच YO-YO TEST आणली गेली. आताही ती सुरू आहे आणि त्यात नव्याने Bronco test चा समावेश केला गेला आहे. आशिया चषक स्पर्धा आणि आगामी दौरे डोळ्यासमोर ठेवून भारतीय खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेतली जात आहे. टीम इंडियातील बरेचसे खेळाडू BCCI च्या बंगळुरू येथील अकादमीत दाखल झाले आहेत, परंतु विराट कोहलीची फिटनेस टेस्ट इंग्लंडमध्ये घेतली गेली आहे. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कुटुंबासह लंडनमध्येच राहतोय...