

Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
Virat Kohli says 2027 World Cup will be his last for India: विराट कोहली आणि रोहित शर्मा, हे दिग्गज खेळाडू आता भारतासाठी फक्त वन डे फॉरमॅटमध्ये खेळतात. ते पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप'च्या तयारीसाठी आपले सर्वस्व पणाला लावण्यास उत्सुक आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेला उद्यापासून सुरूवात होतेय आणि या मालिकेतून ते दम दाखवण्यासाठी सज्ज आहेत. या पार्श्वभूमीवर 'जिओस्टार'शी बोलताना कोहलीने ICC स्पर्धेत खेळण्याच्या आव्हानांवर आणि २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेवर आपले मत मांडले.