Virat Kohli’s return sparks massive demand for 3rd ODI tickets.
esakal
Police struggle to manage fans at Vizag stadium ticket counters : विराट कोहलीची बॅट ही मैदानावर सध्या धुमाकूळ घालतेय... निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना हा पठ्ठ्या सलग शतकं झळकावतोय आणि त्यामुळेच आता कसोटीतून निवृत्ती मागे घ्यायला हवी, अशी मागणी होतेय. भारतीय संघाची कसोटीतील कामगिरी सर्वच पाहत आहेत आणि अशावेळी संघाला विराटची गरज आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत शतक झळकावले आणि तिसऱ्या वन डे सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली. ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे आणि तिसरा सामना निर्णायक आहे. त्यात विराटमुळे Vizag येथे मोठा गोंधळ उडाला आहे.