Sanju Samson: विराट कोहलीचा सल्ला मानला, पण जेमतेम दीड वर्षच पाळता आला; संजू सॅमसनने सांगितला खास किस्सा, नेमक काय म्हणाला संजू?

Sanju Samson Reveals Virat Kohli's Fitness Advice: संजू सॅमसनने विराट कोहलीकडून मिळालेल्या फिटनेस आणि शिस्तीच्या खास सल्ल्याचा खुलासा केला आहे. जवळपास दीड वर्ष विराटचे रूटीन फॉलो केल्यानंतर ते कायम ठेवणे कठीण असल्याची प्रामाणिक कबुली त्याने दिली.
Sanju Samson

Sanju Samson

esakal

Updated on

Sanju Samson Reveals Virat Kohli's Fitness Advice: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा फक्त त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच नाही, तर फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेही जगभरातील क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान मानला जातो.

मैदानावर तासन्तास खेळल्यानंतरही त्याची फिटनेस कायम तशीच दिसते. त्यामुळे अनेक युवा खेळाडू त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आता भारतीय यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने विराटसोबतचा एक खास अनुभव शेअर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com