
Boxing Day Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिलाच दिवस पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासने गाजवला. त्याने निर्भीडपणे खेळ केला. परंतु, याच सामन्यात त्याचे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसोबतही भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता विराट कोहलीवर आयसीसीने कारवाई केल्याचे समजत आहे.
कसोटी मालिकेतील हा चौथा सामना असून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात १० व्या षटकात आधी मोहम्मद सिराज आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात गरमागरमी झाल्याचे दिसले होते.