

Upendra Yadav frustrated Virat Kohli in Ranji Trophy : विराट कोहली १२ वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळणार म्हटल्यावर गर्दी ही जमणारच. दिल्ली क्रिकेट असोसिएशनने त्यासाठी १० हजार प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेची सोय केली होती. पण, प्रत्यक्षात अरुण जेटली स्टेडियमवर जवळपास १६ हजाराच्या आसपास प्रेक्षक उपस्थित राहिले. दिल्ली विरुद्ध रेल्वे ( Delhi vs Railways) या सामन्याकडे एरवी कुणी ढुंकूनही पाहिले नसते, त्या सामन्याला केवळ विराटमुळे गर्दी जमली. दिल्लीचा संघही फुल चार्ज झाला आणि रेल्वेच्या ५ फलंदाजांना ६६ धावांवर माघारी पाठवून सामन्यावर पकड घेतली. पण, एक खेळाडू दिल्लीला नडला आणि संघाला दोनशेपार घेऊन गेला. हे पाहून विराट थोडासा नैराश्यात गेलेला दिसला.