
Indian Players Performance in Ranji Trophy 2025: भारताचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेत फ्लॉप ठरत असताना, ज्या खेळाडूंना खराब फॉर्म सांगून संघातून बाहेर केले होते, ते खेळाडू आता मैदान गाजवत आहे. भारतीय स्टार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत रणजी ट्रॉफी स्पर्धेत पूर्णत: अपयशी ठरले. त्यानंतर काल भारतीय सलामीवीर केएल राहुलही स्वस्तात माघारी परतला. तर आज विराट कोहलीचीही ६ धावांवर दांडी पडली. तर दुसरीकडे खराब फॉर्ममुळे संघाबोहेर असणारे चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सातव्या सामन्यात मैदान गाजवत आहेत. पुजारा अवघ्या १ धावेने तर अजिंक्य रहाणे अवघ्या ४ धावांनी शतकापासून वंचित राहिला.