Virat Kohli in Ranji Trophy: विराटनं Paneer Chilli खाल्ल्यानंतर काय केलं? भन्नाट रिपोर्टिंग, Video पाहून व्हाल लोटपोट

Virat Kohli Paneer Chilli : विराट कोहलीने रणजी करंडक स्पर्धेत १२ वर्षानंतर पुनरागमन केले आणि स्टेडियम हाऊसफुल्ल झाले...
Virat Kohli Paneer Chilli
Virat Kohli Paneer Chilli esakal
Updated on

Virat Kohli Delhi vs Railways Live: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीकडून क्रिकेटच्या मैदानावर खेळायला उतरला. विराट रणजी स्पर्धा खेळणार म्हणून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर जवळपास १६ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. पहाटे ३ वाजल्यापासून प्रेक्षक स्टेडियमच्या गेट क्रमांक १६ जवळ गर्दी करून उभे होते. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि ३ प्रेक्षक जखमी झाले. दरम्यान, विराटने त्याची आवडती डिश चिकन चिली ऐवजी खाण्यासाठी पनीर चिली मागवल्याची बातमी समोर आली. त्यानंतर सोशल मीडियावर एका तरुणाने भन्नाट व्हिडीओ तयार केला आणि सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com