Virat Kohli Rohit Sharma
sakal
Cricket
Virat Kohli Rohit Sharma: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिन्सने व्यक्त केला अंदाज
ODI series begins Sunday, followed by five T20 matches: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा कदाचित शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंसने म्हटले आहे की, या मालिकेत दोघांना प्रत्यक्ष पाहण्याची ही शेवटची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
सिडनी : क्रिकेट विश्वातील दोन सुपरस्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा कदाचित हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. त्यामुळे या दोन महान खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना अखेरची संधी असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने व्यक्त केले आहे.