Virat Kohli आणि Rohit Sharma यांच्या वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा जोर धरत आहे.
2027 World Cup पर्यंत विराट ३९ आणि रोहित ४० वर्षांचे होतील, त्यामुळे ते संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये नाहीत.
IPL नंतर दोघेही क्रिकेटपासून दूर असून BCCI तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहे.
Virat Kohli and Rohit Sharma ODI retirement news : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांच्या वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घटिका समीप आली आहे, असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर या दोघांच्या कसोटी कारकीर्दिला ब्रेक लागला.. इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आणि आता त्यांच्या वन डेतून निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलनंतर दोघंही क्रिकेटच्या मैदानापासून दूरच होते आणि आता त्यांना दूरच ठेवण्याचा प्लॅन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) केला आहे.