
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पराभवासोबत टीम इंडियाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले होते. या लाजीरवाण्या कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) यांनी काही नियम आणले होते. त्यात खेळाडूंसोबत कुटुंबियांच्या दौऱ्यावर बंधनं आणली होती. ३६ वर्षीय विराट कोहलीने ( Virat Kohli) या नियमावर नाराजी व्यक्त करून अप्रत्यक्षपणे बीसीसीआयशी पंगा घेतल्याची चर्चा रंगली आहे.