Virat Kohli Test Retirement: '' १४ वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर उपयोगी येतील असे धडे शिकवले,'' अशी भावनिक पोस्ट लिहून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त असल्याचे जाहीर केले. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराटनेही BCCI ला कसोटी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, त्याच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.