Virat Kohli mimics Arshdeep Singh during India’s practice session at vadodara
esakal
Virat Kohli funny moment during Team India practice : भारत-न्यूझीलंड यांच्या मालिकेतील पहिला वन डे सामना ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत आणि या सराव सत्रात विराट कोहली मज्जा मस्करी करताना दिसला. भारतीय संघाची माजी कर्णधार रन अप करताना अर्शदीप सिंगकडे ( Arshdeep Singh) पाहत होता आणि तो जवळ येताच त्याने त्याच्यासारखे पळण्याची अॅक्शन केली. विराट नकल करत होता, तेव्हा रोहित शर्मा मागे उभं राहून खळखळून हसताना दिसला.