
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. १०० हून अधिक कसोटी खेळलेल्या विराटने अचानक कसोटीतून निवृत्ती घेतल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. भारतीय कसोटी संघाला इंग्लंडमध्ये २० जूनपासून कसोटी मालिका खेळायची आहे.
अशात विराटने त्याआधी निवृत्ती घेतल्याने अनेकांना धक्का बसला. त्याने निवृत्ती घेण्यापूर्वीही जेव्हा त्याबद्दल चर्चा सुरू होती, तेव्हा बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी त्याने हा निर्णय आत्ता घेऊ नये असं म्हटलं होतं.