
इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. बंगळुरू आयपीएलचे आठवे विजेते ठरले. मंगळवारी (३ जून) झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा विजय खास ठरला, कारण १८ वर्षांपासून ही स्पर्धा खेळणाऱ्या या संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तसेच हा विजय विराट कोहलीसाठीही खूप खास ठरला.
विराट एकमेव खेळाडू आहे, जो १८ वर्षे बंगळुरूसाठी खेळत आहे. त्यामुळे १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विराटने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.