Virat Kohli IPL playoff record explained
esakal
Virat Kohli IPL playoff record explained : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी आयपीएल २०२६ चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. गुजरातसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे प्लेऑफ सामन्यांमध्ये विराट कोहलीची कामगिरी फारशी प्रभावी नाही. कोहली या मोसमात १४ सामन्यांमध्ये १६३ च्या स्ट्राइक रेटने ५५७ धावा केल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम नावावर असलेल्या कोहलीला प्लेऑफ सामन्यांमध्ये संघर्ष करावा लागला आहे.