virat kohli in ranji (esakal
Cricket
Virat Kohli in Ranji Trophy: सारं काही विराटसाठी ! चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती, पोलिसांच्या वाहनांचे नुकसान, फॅन मैदानात शिरला... Video
Virat Kohli return Ranji Trophy after 12 years: १२ वर्ष ८६ दिवसानंतर विराट कोहली रणजी करंडक स्पर्धेत मैदानावर उतरला आणि त्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी जमली आहे.
stampede situation outside Arun Jaitley Stadium : विराट कोहली हे नाव किती मोठं आहे, याची प्रचिती आज पुन्हा आली... १२ वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या विराटला पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी जमली होती. फॅन्स पाहाटे ३ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेट नंबर १६ समोर उभे होते. तेथील सुरक्षारक्षकांसाठी हे सारं अनपेक्षित होतं. त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. चप्पलांचा खच जमा झाला होता. यात तिघं जखमी झाल्याचे वृत्त आहे.

