Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरच्या हाती विराटने आयतं कोलीत दिलं! ३६ वर्षीय किंग कोहलीने स्वतःचे मार्ग केले बंद?

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार बीसीसीआयला कळवल्याचे समजते. सध्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटींवरील निवड प्रक्रियेत कोहलीचा समावेश होणार की नाही, याबाबत निर्णय अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे सोपवण्यात आला आहे.
Virat Kohli's Test Retirement
Virat Kohli's Test Retirement esakal
Updated on

Ajit Agarkar to decide Kohli's fate before England Test series

रोहित शर्माने ( Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तेव्हाच आणखी एका सीनियर खेळाडूवर टांगती तलवार होती. तो सीनियर खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli) असेल याची सर्वांना शंका होतीच आणि ती आज खरी ठरली. विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) कळवल्याचे वृत्त सकाळी धडकले. त्याचवेळी विराटने त्याच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा, अशी विनंती बीसीसीआयने केल्याचेही वृत्तात म्हटले आहे. पण, आता बाण सुटला आहे आणि आता विराटच्या हाती काहीच नाही. विराटने निवड समिती प्रमुख अजित आगरकर याच्या हाती आयतं कोलीत दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com