१८ चौकार, ३ षटकार! जडेजाच्या नाबाद १६५ धावांच्या खेळीने संघ फायनलमध्ये पोहोचला, २९२ धावांचे लक्ष्य सहज केले पार...

who is Vishvaraj Jadeja? Vijay Hazare Trophy semi final : विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्राने एकतर्फी विजय मिळवत थेट अंतिम फेरीत धडक मारली. विश्वराज जडेजा याने खेळलेली नाबाद १६५ धावांची अफलातून खेळी हा सामन्याचा केंद्रबिंदू ठरली. १८ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर जडेजाने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला.
Saurashtra Storm into Vijay Hazare Final as Vishvaraj Jadeja Smashes 18 Fours, 3 Sixes

Saurashtra Storm into Vijay Hazare Final as Vishvaraj Jadeja Smashes 18 Fours, 3 Sixes

esakal

Updated on

Vijay Hazare Trophy Saurashtra vs Punjab Semi-Final: सौराष्ट्र संघाने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पंजाबवर दणदणीत विजय मिळवला. पंजाबने ठेवलेले २९२ धावांचे लक्ष्य सौराष्ट्रने ३९.३ षटकांत १ विकेट गमावून सहज पार केले. विश्वराज जडेजा ( Vishvaraj Jadeja) या विजयाचा नायक ठरला. त्याने १२७ चेंडूंत १८ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १६५ धावांची नाबाद खेळी केली. सौराष्ट्र आता जेतेपदाच्या लढतीत विदर्भचा सामना करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com