
Vivek Oberoi with Yuzvendra Chahal and RJ Mahvash Video Viral: काल दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताने इतिहास रचला, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तीन विजेतेपदे पटकावणारा भारत पहिला संघ बनला. भारतविरूद्ध न्यूझीलंड या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. अभिनेता विवेक ओबेरॉय देखील हा सामना पाहाण्यासाठी आला होता. तर भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्ल सोबत सामना पाहाताना दिसला. त्यामुळे फिरकीपटू युझी चहल सामन्यादरम्यान चर्चेत आला.