
Mumbai Cricket: मुंबईतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून मुंबई क्रिकेट संघटना पुढील वर्षी (२०२५) जानेवारी महिन्यातील १२ ते १९ या तारखांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी व एपेक्स काऊन्सिल सदस्य यांच्या उपस्थितीत गुरुवारी विशेष लोगोचेही अनावरण करण्यात आले.